32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसुधरा नाहीतर कायमस्वरूपी रसद करणार बंद-डोनाल्ड ट्रम्प

सुधरा नाहीतर कायमस्वरूपी रसद करणार बंद-डोनाल्ड ट्रम्प

एकमत ऑनलाईन

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड  ट्रम्प यांचा डब्ल्यूएचओला शेवटचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसवरून जागतिक आरोग्य संघटनेवर वारंवार टीका केला आहे. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी संघटनेला कायमस्वरूपी निधी थांबविण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर पुढील 30 दिवसांमध्ये कोणतेही ठोस पावले न उचलल्यास संघटनेचा निधी कायमस्वरूपी बंद केला जाईल.

Read More  कोरोनारुग्णांनी ओलांडला १ लाखाचा टप्पा

ट्रम्प प्रशासनाने एप्रिल महिन्यात डब्ल्यूएचओचा निधी रोखला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रोस गेब्रियेसस यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी पत्रात डब्ल्यूएचओचे महामारी रोखण्यात अपयश, व्हायरसच्या सुरूवातीच्या अहवालांकडे दुर्लक्ष करणे आणि चीनला पक्षपाती असल्याचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

ट्रम्प पत्रात म्हणाले की, संघटनेकडून वारंवार होणारी चूक आणि महामारीला योग्य प्रतिसाद न देणे जगाला महागात पडत आहे. संघटनेकडे एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे चीनपासून वेगळी भूमिका घ्यावी. जर संघटनेने पुढील 30 दिवसांमध्ये ठोस सुधारणा न केल्यास निधी कायमस्वरूपी थांबविण्याचा निर्णय घेतला जाईल व सोबतच संघटनेतील सदस्यत्वाचा देखील पुन्हा विचार केला जाईल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या