22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलस न घेतल्यास सिमकार्ड होणार बंद

लस न घेतल्यास सिमकार्ड होणार बंद

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लसीबाबत अजूनही अनेक नागरीकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दुर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाºयांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे.

डॉ. रशीद म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसीचा पहिला डोस घेणाºया ४ ते ५ लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. पाकिस्तानमध्ये २ फेब्रुवारीपासून मोठया प्रमाणात लसीकरण मोहीमसुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा प्रशासनातर्फे उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या