इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ यांना ८ वर्षे जुन्या फॉरेन फंडिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना नोटीस पाठवत ही सर्व अकाऊंट्स सील का करु नये, अशी विचारणा केली. इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयने ३४ विदेशी नागरिक आणि ३५१ कंपन्यांकडून देणगी घेतली होती.