Tuesday, October 3, 2023

इम्रान खान यांना भारतीय सुरक्षा एजन्सींकडून झटका

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारकडून १ हजार ६०० विद्यार्थ्यांना पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली होती. या योजनेस भारतीय सुरक्षा दलाने नाकारले आहे. या विषया संबधित लोकांनी याबाबतची माहिती गुरुवार दि़ ११ जून रोजी दिली.

भारतीय सुरक्षा अधिका-यांनी सांगितले, शिष्यवृत्ती देऊन काश्मीरी युवकांना कट्टरपंथी बनवणे ही एक पाकिस्तानची रणनीती आहे. नंतर या युवकांनाच भारताविरोधात भडकवले जाते. त्यांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करुन त्यांचा वापर करण्यात येतो. काही काश्मीरी युवकांनी वाघा-अटारी सीमा पार केली आणि नंतर नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादी बनून आले असल्याचे काही उदाहरणे घडली असल्याचे जम्मू – काश्मीरच्या एका वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.

Read More  35 जणांचा जीव घातला धोक्यात : खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या