इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकारण यावेळी संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय बनले आहे. आपल्या कुरापतींमुळे पाकिस्तानला सर्वच स्तरावर घेरण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे निरूपयोगी व्यक्ती असून, ते पाकिस्तानातील घडामोडींपासून अनभिज्ञ असल्याचे म्हणत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्यावर मोठा आरोपही केला.
पंतप्रधान इम्रान खान यांची लक्ष वेधून घेण्याची भूमिका निरूपयोगी आहे. त्यांच्याकडे कोणीही लक्षदेखील देत नाही, असे मरियम खान म्हणाल्याचे पाकिस्तानातील जिओ न्यूजने म्हटले आहे़ यावेळी त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मोठे आरोपही केले. मला दोन वेळा तुरूंगात डांबण्यात आले.
पाकिस्तानमधील सरकार महिलांना संरक्षण पुरवण्यास सक्षम नाही. मला कोणत्या प्रकारे वागणूक दिली गेली ही सांगून मला रडत राहण्याची इच्छा नाही. परंतु मी हे सत्य जगासमोर आणू इच्छीत आहे की तुरूंगांमधील महिलांची स्थिती काय आहे, असेही मरियम म्हणाल्या.
देशात डिसेंबरमध्ये १० कोटी लस तयार