29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइम्रान खान यांनी बहुमत चाचणी जिंकली

इम्रान खान यांनी बहुमत चाचणी जिंकली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शनिवारी मतदान पार पडले. यावेळी इम्रान खान यांच्या पक्षाला १७८ मते मिळाली आहेत. पाकिस्तान सिनेट निवडणुकीत अर्थमंत्री अब्दुल हफीज यांचा पराभव झाल्यामुळे इम्रान खान सरकारला विश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले. परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी नॅशनल असेम्ब्लीमध्ये प्रस्ताव सादर केला. त्यासाठी शनिवारी मतदान पार पडले. या मतदानात इम्रान खान यांच्या पक्षाला १७८ मते मिळाली.

दरम्यान, यापूर्वी विश्वासदर्शक प्रस्तावाच्या मतदानावेळी विरोधकांकडून संसदेत बहिष्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे इम्रान खान यांना दिलासा मिळाला होता. विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच इम्रान खान यांनी आपल्या खासदारांना पक्षाची भूमिका फॉलो करण्यास सांगितले होते़ तसेच, या प्रस्तावादरम्यान जो निर्णय येईल, तो आपल्याला मान्य असल्याचे खान म्हणाले होते.

इम्रान समर्थकांचा हल्ला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्यावर इम्रान खान समर्थकांनी हल्ला केला. यावेळी अब्बासी यांचे समर्थक इम्रान खान समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेतक-यांवर अत्याचार होतायेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या