इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे शहरातील बनी गालाजवळील भागात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे इस्लामाबाद पोलिसांनी म्हटले आहे. इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
इस्लामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामाबादमध्ये लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराच्या परिसरात असलेल्या गालामध्ये त्यांच्या आगमनाच्या माहितीनुसार सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, इम्रान खान यांच्या टीमच्या पुनरागमनाबाबत पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.