22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइम्रान खानच्या अडचणीत वाढ

इम्रान खानच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद :े अनेक दिवसांपासून पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार वेगवेगळया कारणांमुळे अडचणीत येताना दिसत आहे. आता पाकिस्तानसमोर अंतर्गत कलहाचे संकट आले आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील आदिवासी भागात दोन जमातींमध्ये मोठा वाद सुरू आहे.

शिया आणि सुन्नी जमातींमध्ये वाद सुरू आहेत. शिया आणि सुन्नी समाजामध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या वादामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यु झाला आहे आणि १५ जण जखमी आहेत. जंगलातील झाडे तोडणे आणि जमिनीचा ताबा घेणे यावरून हा संघर्ष सुरू आहे.

या दोन जमातीतील संघर्षामध्ये शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. त्यामुळे याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात येत आहे. या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमधील जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुन्नी मुस्लिम अनेकदा शिया मुस्लिमांवर हल्ले करतात. पाकिस्तानच्या मुस्लिम लोकसंख्येपैकी २० टक्के शिया मुस्लिम आहेत.

दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाकिस्तानचा समावेश वर्ल्ड जस्टीस प्रोजेक्टच्या अनुक्रमणिकेमध्ये २०२१ सालात पाकिस्तान १३० क्रमांकावर आहे. सदर निर्देशांकामध्ये १३९ देशांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या