18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकॅनडासह २१ देशांमध्ये चीनच्या ३० पोलिस चौक्या

कॅनडासह २१ देशांमध्ये चीनच्या ३० पोलिस चौक्या

एकमत ऑनलाईन

बीजिंग : तिसरी महासत्ता अशी ओळख प्रस्थापित करणा-या चीनने अनेक देशांमध्ये अवैध पोलिस ठाणी सुरू केली आहेत. कॅनडा, आयर्लंड यांसारख्या विकसित देशांमध्ये चिनी पोलिस ठाणी सुरू केली आहेत. ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम रिपोर्टिका’ने स्थानिक माध्यमांचा हवाल देत म्हटले आहे, की चिनी पोलिस ‘फुझो’ने संपूर्ण कॅनडात पब्लिक सिक्युरिटी ब्युरो (पीएसबी) संलग्न असणा-या अशा अनौपचारिक पोलिस सेवा सुरू केल्या आहेत.

चीनला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी ही योजना चीनने आखली आहे. तसेच या पोलिस चौक्यांच्या मदतीने चीन सरकार संबंधित देशांमधील निवडणुकांतही हस्तक्षेप करीत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. याउलट आंतरराष्ट्रीय गुन्हे हाताळण्यास या चौक्या सक्षम असल्याचा दावा चीनने केला आहे.

फुझो पोलिसांच्या माहितीनुसार २१ देशांमध्ये अशा ३० चौक्या उभारल्या आहेत. युक्रेन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि ब्रिटन अशा देशांमध्ये चिनी पोलिस ठाणी आहेत आणि यातील अनेक देशांचे नेते सार्वजनिक व्यासपीठांवरून चीनमधील वाढत्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल सवाल करीत असतात.

विविध देशांमध्ये सुरू केलेल्या पोलिस चौक्या म्हणजे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आहेत. विदेशात राहणा-या चिनी नागरिकांना स्थानिक पोलिस तक्रारी दाखल करणे आणि अन्य कामांमध्ये मदत करण्यासाठी अशी ठाणी सुरू केली आहेत. चिनी सरकारी माध्यमांनुसार या पोलिस ठाण्यांच्या माध्यमांतून आरोपींना चीनला परत पाठविण्यास भाग पाडले जाते.

मानवी हक्क कार्यकर्त्यांचा दावा
सुरक्षेच्या नावाखाली चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीकडून देशात अत्याचार केला जात असल्याचा आरोप मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये लोकांना नजरकैद करणे, कुटुंबांना जबरदस्तीने वेगळे करणे आणि नसबंदीसाठी सक्ती करणे, अशा प्रकारची छळवणूक केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या