26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकमध्ये कांदा ५०० तर टोमॅटो ४०० रुपये किलो

पाकमध्ये कांदा ५०० तर टोमॅटो ४०० रुपये किलो

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : टोमॅटो, बटाटे आणि कांद्याच्या किमती गगनाला भिडल्यामुळे पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये अन्नपदार्थ आवाक्याबाहेर जात आहेत. परकीय चलनाचा साठा कमी होत असताना आणि जवळपास पाच दशकांतील सर्वात तीव्र चलनवाढ यामुळे पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात सापडला होता. आता मुसळधार पावसाने देशातील एक तृतीयांश पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे लोकांना अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पाकिस्तानातील आणखी ८ जिल्हे आठवड्याच्या शेवटी पुरामुळे प्रभावित झालेल्या ८० क्षेत्रांच्या आपत्ती यादीत सामील झाले आहेत. अली असगर लोंदर यांच्या म्हणण्यानुसार, सिंधू नदीच्या पश्चिम किर्ना­याजवळ असलेल्या दादू या शहरामध्ये निर्वासन तंबूत राहणा-या हजारो लोकांपैकी एकाने भाजीपाल्याच्या किंमतीत ५००% वाढीचे संकेत दिले आहेत. पुरापूर्वी कांदा ३०० रुपयांना विकला जात होता. दादू येथील भात आणि कांद्याच्या उत्पादनाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर बटाट्याचे दर चार पटीने वाढून १०० रुपये किलो झाले आहेत. टोमॅटो ३०० टक्क्यांनी वाढून ४०० रुपये किलो झाला आहे. इतर ठिकाणीही गोदामे तुंबल्याने डेअरी आणि मांसाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये अशा तीव्र वाढीमुळे पाकिस्तानच्या आधीच नाजूक आणि राजकीयदृष्ट्या विभाजित अर्थव्यवस्थेवर तणाव वाढण्याची शक्यता आहे.

१३०० हून अधिकांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे अंदाजे १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे आणि पाच लाख लोकांना छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या आपत्तीमुळे शेतजमिनीचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसाने देशातील पिकांची नासाडी केली आहे,

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या