34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

अमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या वेगाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. अशातच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे.

अमेरिकेने यापुर्वी १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असे सांगितले.

तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या भारतातही कोरोनाची लस १८ वर्षांपुढील सर्वांनाच द्या, अशी मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर अमेरिकेत आता १८ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळणार असल्याने भारतातही ही मागणी आणखी जोर धरण्याची शक्यता आहे.

राज्यात ५५ हजारांवर नवे रुग्ण चिंता वाढली, २९७ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या