26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलसीच्या दोन डोसमधले अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही

लसीच्या दोन डोसमधले अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधले अंतर वाढवण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. भारताने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसºया डोसमधले अंतर वाढवण्याचा घेतलेला निर्णय वाजवी आहे, असे डॉ. फौची म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना परिस्थितीच्या हाताळणीवर फौची यांनी परखडपणे भूमिका मांडली होती. मात्र, आता फौची यांनी भारत सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यासाठी कारणेदेखील दिली आहेत. तसेच, येत्या काळात भारताने कोणत्या प्रकारे पावले उचलायला हवीत, यावर देखील डॉ. फौची यांनी सल्ला दिला आहे.

कोविशिल्ड लसीच्या डोसमधले अंतर वाढवण्याच्या निर्णयाचा फौची यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला आहे. जेव्हा तुम्ही भारतासारख्या कठीण परिस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मला वाटते की दोन डोसमधले अंतर वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय वाजवी आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच, डोसमधले अंतर वाढवल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेदेखील डॉ. फौची म्हणाले आहेत.

कोविड परिस्थितीमुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत ना. श्री. अमित देशमुख यांचे फेरप्रस्तावाचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या