26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय टेक कंपन्यांकडून २ लाख अमेरिकनांना रोजगार

भारतीय टेक कंपन्यांकडून २ लाख अमेरिकनांना रोजगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे. गेल्या कित्येक दशकांपासून देशातील बेरोजगारी संपावी आणि रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते पण नुकत्याच एका नॅसकॉमच्या नवीन अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी भारतीय तंत्रज्ञान उद्योगातून अमेरिकेच्या दोन लाखाहून लोकांना रोजगार मिळाला. म्हणजेच भारताने अमेरिकेला तब्बल १०३ अब्ज डॉलर उभे करण्यास मदत केली.

नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले की, भारतीय टेक सेक्टर फॉर्च्युन ५०० पैकी ७५ टक्क्यांहून अधिक कंपन्यांसोबत काम करते, ज्यातील बहुतांश कंपन्यांचे मुख्यालय यूएसमध्ये आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय अमेरिकेत टेक हब राज्यात टॅलेंटचा विस्तार करणे, यात भारतीय टेक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि यात राज्यांनी त्यांच्या रोजगाराच्या दरात मागील दशकात ८२ टक्के वाढ केल्याची माहितीही घोष यांनी दिली.

भारताचा बेरोजगारी दर खुप वाढला असून हे भारतासमोर आव्हान असल्याचे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगार मिळत असल्याने देशात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सीएमआयई म्हटले आहे.

भारतात ५ कोटी बेरोजगार
देशात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या आणि बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा समोर आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केलेल्या अहवालानुसार भारतात बेरोजगारांची संख्या डिसेंबर २०२१ पर्यंत ५.३ कोटी इतकी समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे यात महिलांचा आकडासुध्दा मोठा आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार जे काम शोधत आहे, त्यांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ३.५ कोटी लोक कामाच्या शोधात आहेत. यामध्ये ८० लाख महिलांचा समावेश आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे तर ५.३ कोटी बेरोजगारीच्या आकडेवारीत महिलांचा आकडा १.७ कोटी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या