26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारत आणि नेपाळ चांगले मित्र - ओलींचा यू-टर्न

भारत आणि नेपाळ चांगले मित्र – ओलींचा यू-टर्न

एकमत ऑनलाईन

काठमांडू : नेपाळमधील राजकीय गोंधळादरम्यान कार्यकारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भूमिका दिवसोंदिवस मवाळ होताना दिसत आहे. चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणा-या ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहेत, असे ओली यांनी म्हटले आहे. नेपाळला स्वत:चे स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असेही ओली यांनी म्हटले आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्या मध्ये येऊ शकत नाही, असे म्हटले आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.

ओली यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो असेही म्हटले आहे. नेपाळ आणि भारताचे खूप चांगले संबंध असल्याचेही ओली यांनी अधोरेखित केले आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार ओली सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ओली यांनी यांच मुलाखतीमध्ये नेपाळच्या जनतेला संदेश देताना नेपाळच्या हितापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त महत्वाची नसल्याचे म्हटले आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरु आहे. भारतासोबत सुधारलेले संबंध आणि करोना लसीच्या जोरावर पुन्हा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची रणनीती ओली यांनी आखल्याचे राजकीय जाणकार सांगतात. सध्या नेपाळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याने, ओली यांचे हे वक्तव्य एक नियोजित धोरणांनुसार केलेले वक्तव्य असून सध्या नेपाळला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असे सांगितले.

ओली यांना भारताची गरज आहे
ओली यांनी आपण भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. नेपाळमध्ये निवडणुकीची घोषणा झाली असून ओली यांना सध्या पाठिंब्याची गरज आहे. भारताचे नेपाळमधील माजी राजदूत असणाºया लोकराज बरल यांनी ओलींच्या या वक्तव्याचा अर्थ दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे हे दाखवणार आहे, असे मत व्यक्त केले आहे़ नेपाळचे परराष्ट्र मंत्री आणि ओली यांचे निकटवर्तीय असणारे प्रदीप ज्ञवली हे १४ जानेवारी रोजी भारत दौºयावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ओली यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.

कौशल्य विकास विभाागाकडे दीड लाख बेरोजगारांची नोंदणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या