26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत-चीन सैन्याची दोन भागांतून माघार

भारत-चीन सैन्याची दोन भागांतून माघार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुरुवारी भारत आणि चीनच्या सैन्याने बैठकीत मोठा निर्णय घेतला आणि गोगरा-हॉट स्प्रिंग्समधून माघार घेण्याचे मान्य केले. दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केल्याची माहिती लष्कराने दिली आहे. चीननेही सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.

जुलैमध्ये सुरू झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या १६व्या फेरीत मान्य केल्याप्रमाणे शांततापूर्ण वातावरण प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या १६व्या फेरीत आज झालेल्या सहमतीनुसार भारतीय आणि चिनी सैन्याने गोगरा-हॉटस्प्रिंग्स परिसरात नियोजित माघार सुरू केली आहे. जे शांततेसाठी अनुकूल आहे. सीमावर्ती भागात देखील शांतता राखेल, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात उझबेकिस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनंिपग यांच्यातील बैठकीच्या काही दिवस आधी हे वक्तव्य आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या