28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारताने प्रथमच केले रशियाविरोधात मतदान

भारताने प्रथमच केले रशियाविरोधात मतदान

एकमत ऑनलाईन

संयुक्त राष्ट्रे : युक्रेन युद्धानंतर भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये युक्रेनवरील प्रक्रियात्मक मतदान दरम्यान भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले. युक्रेनमध्ये रशियाचे सहा महिन्यांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात अनेकदा मतदान केले आहे. मात्र, भारताने रशियाविरोधात मतदानात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांना व्हिडिओ-टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले होते. फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. आतापर्यंत भारत युक्रेनचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत टाळत आला होता.

भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देश नाराज आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक आणि इतर निर्बंध लादले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केलेला नाही. नवी दिल्लीने रशिया आणि युक्रेनला मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्याचे वारंवार आवाहन केले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी सर्व राजनैतिक प्रयत्नांमध्ये सहकार्य व्यक्त केले आहे.

भारत दोन वर्षांसाठी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचा कायमस्वरूपी सदस्य आहे. कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षा परिषदेने बुधवारी सहा महिने चाललेल्या युद्धाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या