16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजी-७ बैठकीत भारताला आमंत्रण

जी-७ बैठकीत भारताला आमंत्रण

- चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
कोरोनाच्या संसर्गामुळे चीन आणि अमेरिकेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चीनला शह देण्यासाठी ट्रम्प सर्वच पातळीवर प्रयत्न करत आहे. जी-७ या राष्ट्र समूहाच्या बैठकीत भारताचा समावेश करण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-७ गटाचे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. भारतासह इतर चीनविरोधी देशांचा समावेश करण्यासाठी ट्रम्प यांनी ही हे संमेलन पुढे ढकलले असल्याची चर्चा आहे. या समूहातील देशांना कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. अशातच चीनविरोधी गट मजबूत करण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत, रशिया, दक्षिण कोरिया आणि आॅस्ट्रेलियाचा सहभाग करण्याची इच्छा आहे. या देशांचे सध्या चीनसोबत संबंध चांगले नाहीत. याच परिस्थितीचा फायदा अमेरिका घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Read More  सुनेकडून घरातील काम करून घेणं सामान्य बाब -केरळ हायकोर्ट

जी-७ राष्ट्र समूहात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी आणि जपान या देशांचा समावेश आहे. जी-७ हा राष्ट्र समूह विकसित आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांचा समूह आहे. आर्थिक धोरण, पर्यावरणीय बदल आदीसह इतरही जागतिक मुद्यांवर चर्चा केली जाते. दरवर्षी दोन दिवसांची बैठक पार पडते. प्रत्येक देशाला रोटेशननुसार या संमेलनाचे यजमानपद आणि अध्यक्षपद मिळते.

सुरक्षा परिषद निवडणुकीत भारताची उमेदवारी निश्चित
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आपल्या पाच अस्थायी जागांसाठी पुढील महिन्यात नवीन निवडणूक प्रक्रियेअंतर्गत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एशिया पॅसिफिक जागेसाठी एकमेव दावेदार असल्याने ही जागा भारताला मिळण्याचे निश्चत मानले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९३ सदस्यांच्या महासभेने शुक्रवारी पूर्ण बैठकीऐवजी गुप्तमतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक घेण्यासंबंधी निर्णय घेतला. या निर्णयानुसार सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड, तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड पूर्ण बैठकीशिवाय जून २०२०मध्ये करण्यात येणार आहे.

पाच अस्थायी सदस्यांसाठी २०२१-२२ या सत्रासाठी १७ जून रोजी निवडणूक होणार होती. भारत हा अस्थायी सदस्याच्या जागेवरील उमेदवार असून, एशिया पॅसिफिक गटातील एकमेव उमेदवार असल्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एशिया पॅसिफिक गटातील भारताच्या उमेदवारीला ५५ सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले होते. यात चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. भारताच्या दृष्टिकानातून पाहायचे झाले तर, निवडणूक प्रक्रियेत कोणताही बदल केला तरी भारताच्या उमेदवारीवर परिणाम होणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या