25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत आमचा ‘टेस्टेड फ्रेन्ड’

भारत आमचा ‘टेस्टेड फ्रेन्ड’

एकमत ऑनलाईन

ढाका : बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना ५ सप्टेंबरला भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-यात दोन्ही देशांदरम्यान अनेक गंभीर मुद्यांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शेख हसीना यांनी एजन्सीला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी भारताला बांगला देशचा ‘टेस्टेड फ्रेन्ड’ (परीक्षित मित्र) म्हणून वर्णन केले आहे, त्याचवेळी कठीण काळात मदत केल्याबद्दलही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

शेख हसीना म्हणाल्या की, रशिया-युक्रेन युद्धात आमचे अनेक विद्यार्थी पूर्व युरोपमध्ये अडकले होते, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने वाचवले. त्यांनी आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. यादरम्यान शेख हसीना यांनी लस मैत्री कार्यक्रमांतर्गत शेजारी देशांना कोविड-१९ लस देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले.

रोहिंग्यांनी मायदेशी परतावे : शेख हसीना
आमच्या सरकारने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय देत आहोत आणि सर्व काही पुरवत आहोत. परंतु, या कोविड दरम्यान आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचे लसीकरण केले. पण, ते इथे किती दिवस राहणार? त्यामुळे ते छावणीतच आहेत. काही लोक अमली पदार्थांची तस्करी, महिलांची तस्करी करताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ते जितक्या लवकर मायदेशी परततील, ते आपल्या देशासाठी आणि म्यानमारसाठीही चांगले आहे असेही हसीनांनी सांगितले. आम्ही रोहिंग्यांसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आसियान किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या इतर देशांशीही चर्चा करत आहोत असे हसीना म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या