26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअन्न सुरक्षेत भारत जगात ७१ व्या स्थानी

अन्न सुरक्षेत भारत जगात ७१ व्या स्थानी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ११३ देशांच्या ग्लोबल फूड सेक्युरिटी (जीएफएस) निर्देशांक २०२१ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर आहे. एकूण गुणांमध्ये भारताने दक्षिण आशियात सर्वोत्तम स्थान मिळवले. पण अन्न सुरक्षेच्या बाबतीत शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापेक्षा मागे आहे. अन्न सुरक्षेच्या श्रेणीत पाकिस्तानने (५२.६ गुणांसह) भारतापेक्षा (५०.२ गुण) चांगले गुण मिळवले आहेत.

इकॉनॉमिस्ट इम्पॅक्ट आणि कॉर्टेवा ऍग्रीसायन्सने जागतिक अहवाल जारी केला. यात जीएफएस इंडेक्स -२०२१ च्या या श्रेणीत ६२.९ गुणांसह श्रीलंकेने आणखी चांगली कामगिरी केली. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि अमेरिका यांनी ७७.८ ते ८० गुणांच्या एकूण जीएफएस निर्देशांकात अव्वल स्थान सामायिक मिळवले आहे. जीएफएस निर्देशांक २०३० पर्यंत शून्य उपासमारीच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी आवश्यक प्रणालीगत दोषांकडे लक्ष वेधतो.

जीएफएस इंडेक्स ११३ देशांमध्ये अन्न सुरक्षेच्या मूलभूत घटकांचे मोजमाप करते, जे परवडण्या योग्यता, उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधने आणि लवचिकता यासारख्या घटकांवर आधारित आहे. या अहवालात आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वीत्झर्लंड, नेदरलँड, जपान, फ्रान्स आणि अमेरिका सर्वोच्च स्थानावर आहेत. या अहवालातून मागच्या १० वर्षांत विविध देशआंनी अनुसुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलली याचा अंदाज येतो. दरम्यान, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण अन्नाबाबत भारताची स्थिती पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेपेक्षा चांगली आहे. तथापि, भूक आणि कुपोषणासारखी समस्या कायमची मिटविण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि वैश्विक पातळीवर कार्यवाही करण्याची गरज आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार एकूण ५७.२ गुणांसह ११३ देशांच्या जीएफएस निर्देशांक-२०२१ मध्ये भारत ७१ व्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान (७५ व्या), श्रीलंका (७७ व्या), नेपाळ (७९ व्या) आणि बांगलादेश (८४ व्या) स्थानावर आहे. भारत चीनपेक्षाही (३४ व्या स्थानी) खूप मागे आहे. अन्न उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अन्न उत्पादनासाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भारताने जीएफएस निर्देशांक २०२१ मध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा चांगले गुण मिळवले, तर गेल्या १० वर्षांमध्ये संयुक्त अन्न सुरक्षा स्कोअरमध्ये भारताचा वाढता नफा पाकिस्तान नेपाळ आणि बांगलादेशच्या मागे होता.

अन्न उत्पादन, गुणवत्तेत भारताचे चांगले पाऊल
अन्न उपलब्धता, गुणवत्ता, सुरक्षा आणि धान्य उत्पादनात नैसर्गिक संसाधनांच्या सुरक्षेबाबत भारताची कामगिरी चांगली असून, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेपेक्षा उत्कृष्ट प्रदर्शन आहे. मात्र, मागच्या १० वर्षांत समग्र अन्न सुरक्षेत भारताचा वृद्धीदर पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंकेपेक्षा अधिक चांगला आहे.

भूक निर्देशांकात भारत पिछाडीवरच
याआधीही जागतिक भूक निर्देशांक २०२१ मध्ये भारत ११६ देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२० मध्ये भारत या यादीत ९४ व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या