30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअरबपतींच्या यादीत भारत तिस-या स्थानी

अरबपतींच्या यादीत भारत तिस-या स्थानी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध मासिक म्हणून ओळख असलेल्या फोर्ब्जने जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यादीत भारताने तिसरे स्थान पटकावले आहे. यादीत अमेरिका पहिल्या तर भारताचा शेजारी चीन दुस-या स्थानी आहे. जर्मनी व रशिया हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा ४९३ नवीन उद्योगपतींनी अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.

जागतिक शक्ती म्हणून नोंद असलेल्या अमेरिकेत सध्या ७२४ अब्जाधीश आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेत ६१४ अब्जाधीश होते. यंदा त्यात ११० जणांची वाढ झाली आहे. चीनही अमेरिकेपेक्षा अधिक मागे नसून चीनमध्ये यंदा अब्जाधीशांची संख्या ही ६९८ इतकी आहे. विशेष म्हणजे त्यात तब्बल ४५६ वरुन ६९८ अशी तब्बल २४२ अब्जाधीशांची वाढ झाली आहे. अमेरिकेपेक्षा अधिक वेगाने अब्जाधीशांची वाढ गेलय एका वर्षात चीनमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी चीन -अमेरिका व्यापारयुद्ध जोरात सुरु होते. तसेच कोरोनाचाही फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा बसला आहे.

मात्र तरीही चीनमध्ये गेल्यावर्षी अब्जाधीशांच्या संख्येत झालेली मोठी वाढ त्यांच्यामधील उद्योगप्रियता व उद्योगस्रेही वातावरणाचे निदर्शक असल्याचे मानले जात आहे. भारतानेही चांगली प्रगती केली असून तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. जर्मनी एका स्थानावरुन घसरुन चौथ्या तर रशिया पाचव्या स्थानी कायम आहे. एकुणच यादीत तुलनात्मक दृष्ट्या पहावयाचे गेल्यास भारत व चीन या आशिया खंडातील देशांची कामगिरी गुणात्मक दृष्ट्या वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे संपुर्ण जगावर कोरोनाने घातलेला आर्थिक विळखा पाहता अब्जाधीशांच्या संख्येत सर्व ५ पहिल्या देशांमध्ये घट न होता वाढच झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजे कोरोनाचा आर्थिक फटका गरीबांनाच अधिक बसल्याचेही दिसून येत आहे.

पहिल्या दहात आशिया खंडातून फक्त अंबानी
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या दहाजणांमध्ये भारताच्या केवळ मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. तर पहिल्या स्थानी अमेरिकेच्या अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजॉस यांचा तर दुस-या स्थानी अमेरिकेच्याच टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत चीनच्या एकाही अब्जाधीशाचा समावेश नसून भारताच्या रिलायन्य उद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी १० व्या स्थानी झेंडा फडकवला आहे. मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात मोठे अब्जाधीश ठरले असून त्यांनी चीनच्या अलिबाबाच्या जॅक मा यांना मागे ढकलले आहे.

भारताने जर्मनीला पछाडले
भारतातही गेल्यावर्षीपेक्षा चांगल्या प्रमाणात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात गेल्यावर्षी १०२ अब्जाधीश होते; मात्र यंदा त्यात ३८ ने वाढ होत ही संख्या १४० वर गेली आहे. गेल्यावर्षी चौथ्या स्थानी असलेल्या भारताने यंदा जर्मनीला पछाडून तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. भारतातील पहिल्या ५ अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानींसह, गौतम अदानी, शिव नाडर, राधाकृष्ण दमाणी व उदय कोटक यांचा समावेश आहे.

देशाच्या परकीय चलन साठ्यात घट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या