25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारत उद्यापासून ‘यूएनएससी’चा अध्यक्ष

भारत उद्यापासून ‘यूएनएससी’चा अध्यक्ष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे. या काळात भारत सागरी सुरक्षा, शांती रक्षण आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय करणारी समिती या तीन समित्यांचे अध्यक्षपदही सांभाळणार आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायम प्रतिनिधी टी. एस़ तिरुमूर्ती ही जबाबदारी सांभाळतील. विशेष म्हणजे यंदाच्या १५ ऑगस्ट (रविवार १५ ऑगस्ट २०२१) रोजी देश स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव (७५वा स्वातंत्र्यदिन) साजरा करणार आहे आणि ऑगस्टमध्येच भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस सोमवार २ ऑगस्ट २०२१ हा असेल. भारत ऑगस्ट २०२१ या एका महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळेल. यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा एक महिन्यासाठी भारत सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळेल. भारत जानेवारी २०२१ पासून दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य झाला. याआधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य म्हणून भारताची १९५० मध्ये पहिल्यांदा निवड झाली. भारत १९५० पासून आतापर्यंत आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य झाला आहे. यावेळी भारत २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य झाला आहे.

भारताला १९२ पैकी १८४ मते
सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्य निश्चित करण्यासाठी झालेल्या मतदानात संयुक्त राष्ट्रांच्या १९२ पैकी १८४ देशांची मते मिळाल्यामुळे भारताला हंगामी सदस्यत्व मिळाले. हंगामी सदस्यत्वासाठी एवढी मते मिळवणारा भारत हा संयुक्त राष्ट्रांतील पहिला देश आहे. याआधी २०११ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य झाला होता.

प्रत्येक देशाला एका महिन्यासाठी अध्यक्षपद
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत १० हंगामी सदस्य आहेत. यापैकी पाच आशिया खंडातून, दोन लॅटिन अमेरिकेतून आणि दोन पश्चिम युरोपमधून निवडले जातात. पूर्व युरोपमधून एका सदस्याची निवड होते. हंगामी सदस्यांना दोन वर्षांची मुदत मिळते. भारत ऑगस्ट २०२१ मध्ये सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. सुरक्षा परिषदेत पाच कायम सदस्य आणि दहा हंगामी सदस्य आहेत. प्रत्येक देशाला एक महिन्यासाठी अध्यक्षपद दिले जाते.

भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा
सध्या सुरक्षा परिषदेत भारत, नॉर्वे, केनिया, आयर्लंड, मेक्सिको, एस्तोनिया, नायझर, सेंट ंिव्हसेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हे हंगामी सदस्य आहेत. सुरक्षा परिषद ही १५ देशांची मिळून तयार झाली आहे. या परिषदेत २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांत भारताकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

एअर इंडियाचे ११ ऑगस्टपासून उड्डाणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या