19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयउंचावरील युद्धांसाठी भारतीय सैन्य जगात अव्वल

उंचावरील युद्धांसाठी भारतीय सैन्य जगात अव्वल

एकमत ऑनलाईन

बीजिंग: भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेले अनुभवी सैन्य आहे. अशा उंच ठिकाणी लढाई लढताना आवश्यक असणारे गिर्यारोहणाचे कौशल्य प्रत्येक भारतीय सैनिकाकडे आहे, असे मत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी (पीएलए) उपकरणे तयार करणा-या कंपनीच्या अधिका-याने आणि चीनशी संबंधित लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मॉडर्न वेपनरी मासिकाचे ज्येष्ठ संपादक हुआंग गुओझी यांनी लिहिलेल्या लेखामध्ये भारतीय सैन्य हे उंचावरील लढायांसाठी चीनी सैन्यापेक्षा सरस असल्याचे मत व्यक्त केले आहे़ पठार आणि पर्वतरांगा असा दोन्ही ठिकाणी लढाई करु शकणारा सध्या जगातील सर्वात मोठा आणि अनुभवी सैन्य हे अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपियन देशांकडून नसून ते भारताकडे आहे, असे गुओझी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

हे कौतुक विशेष का?
लष्करी आणि संरक्षणासंदर्भातील माहिती देणारे मॉडर्न वेपनरी हे एक महत्वाचे मासिक मानले जाते. विशेष म्हणजे हे मासिक चीन सरकारच्या मालकिच्या चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडशी (एनओआरआयएनसीओ) संबंधित आहे. पीएलएसाठी यंत्रे, डिजिटलाइज्ड आणि स्मार्ट उपकरणे विकासित करण्याची मुख्य जबाबदारी एनओआरआयएनसीओकडे आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाशी संबंधित कामांमध्येही या कंपनीचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अशा कंपनीच्या मालकीच्या मासिकाच्या संपादकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक होणे हे विशेष मानले जात आहे़

Read More  पालघर साधु हत्याकांड : घटनेची सीबीआय चौकशी करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा होकार

भारतीय सैनिकाला गिर्यारोहन बंधनकारक
भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेरेषेजवळ मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा लेख छापण्यात आला आहे. सामान्यपणे कडवा राष्ट्रवाद आणि आपल्याकडील तंत्रज्ञान तसेच लष्कराचे कौतुक करण्याची परंपरा असणाºया चीनी प्रसारमाध्यमांमध्ये अशाप्रकारे भारताचे कौतुक क्वचितच पहायला मिळते. त्यामुळेच हा लेख अनेक अर्थांना विशेष असून यामधून भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसून येत आहे. भारतीय लष्करातील प्रत्येक सैनिकाला गिर्यारोहणचे कौशल्य अवगत असणे बंधनकारक आहे. इतकेच नाही तर भारत गरज पडल्यास खासगी गिर्यारोहक तसेच शिकावू गिर्यारोहकांचीही मदत घेऊ शकतो, असे गुओझी सांगतात.

जगातील सर्वात मोठी फौज
१२ तुकड्यांमध्ये असणारे दोन लाख भारतीय सैनिक हे गिर्यारोहणाचे कौशल्य असणारी आणि पर्वतरांगांमध्ये यशस्वीपणे युद्ध करण्याची क्षमता असणारी जगातील सर्वात मोठी फौज आहे, असे गुओझी यांनी म्हटले आहे. भारताने १९७० पासून सातत्याने आपल्या सैन्यदलामधील सैनिकांची संख्या वाढवली असल्याचे निरिक्षण गुओझी यांनी नोंदवले आहे. भविष्यात भारत पर्वतरांगांमध्ये युद्ध करणाºया ५० हजार सैनिकांची विशेष फौज तयार करण्यासंदर्भात तयारी करत असल्याचेही गुओझी यांनी म्हटले आहे.

भारताची तयारी किती
भारतीय लष्कराबद्दल बोलताना गुओझी यांनी सियाचीन ग्लेशियरचे उदाहरण दिले आहे. पाच हजार मीटर उंचीवर भारताने सियाचीन ग्लेशियरमध्ये टेहाळणी बुरुज उभारले आहेत. तेथे सहा ते सात हजार सैनिक तैनात असतात. यामधील सर्वात उंचीवरील पोस्ट ही ६ हजार ७४९ मीटरवर आहे़ भारताने परदेशातून तसेच स्वत: संशोधन करुन मोठ्या प्रमाणात अशा उंच ठिकाणी लढाई करण्यासाठी शस्त्र तयार केली आहेत. ही शस्त्र भारतीय सैन्य पठारी भागांबरोबरच उंच पर्वतांवर लढाई झाल्यास वापरु शकते. भारताने अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्र विकत घेतली आहे. यामध्ये एम ७७७, जगातील सर्वात हलके १५५ मि.मी. टॉवेड हॉवित्झर आणि अवजड वाहतूक करणारे चिनुक हेलिकॉप्टरचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर गरज पडल्यास बंदुकांपासून, शस्त्र आणि दारुगोळा या पर्वतरांगामध्ये पुरवू शकते, असे गुओझी म्हणतात. तसेच पर्वतरांगांमध्ये तैनात असणाºया सैनिकांकडे अत्याधुनिक रायफल्स असल्याचेही गुओझी सांगतात. मात्र त्याचवेळी भारताकडे स्वदेशात बनवलेली शस्त्र नसून त्यांना पाश्चिमात्य देशांवर यासाठी निर्भर रहावे लागत असल्याचेही गुओझी यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या