26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय नौदलाच्या महिलांचा विक्रम

भारतीय नौदलाच्या महिलांचा विक्रम

एकमत ऑनलाईन

भारतीय नौदलाच्या महिलांची विक्रमी कामगिरी; सागरी क्षेत्रात केली गस्त
मुंबई : मुंबई नौदलातील पाच महिलांनी उत्तर अरबी समुद्रात नुकत्याच पार पाडलेल्या मोहिमेमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली. डॉनीअर २२८ एअरक्राफ्टच्या मदतीने सागरी क्षेत्रात महिलांच्या टीमची पहिली-वहिली गस्त मोहीम पार पडली.

या मोहिमेत एकुण पाच मिशन कमांडरचा समावेश होता. पोरबंदरच्या महिलांच्या चमुने ही कामगिरी पार पाडली. या पाच जणांच्या टीमचे नेतृत्व करणा-या आंचल शर्मा, शिवांगी, अपुर्वा गिते या पायलटच्या टीमचा समावेश होता. तर टॅक्टिकल आणि सेन्सर ऑफिसर पूजा पंडा, पूजा शेखावत यांच्याही टीमचा समावेश होता.

या सगळ्या महिला अधिका-यांनी अनेक महिने प्रशिक्षण घेऊन ही मोहीम पार पाडली. भारतीय नौदलाने कायम महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये महिला पायलट्सची निवड, महिला एअर ऑपरेशन अधिका-यांची नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या