लंडन : यूकेमधील केटरिंग येथील मूळ केरळची परिचारिका अंजू अशोक आणि तिच्या २ लहान मुलांची १५ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.
मृत्यूपूर्वी तिने आपल्या बहिणीला ताणलेल्या लग्नसंबंधांविषयी सांगितले होते. अंजूचा ५२ वर्षीय पती सी साजू नॉर्थम्प्टनशायर पोलिसांच्या ताब्यात आहे. नोकरी गेल्याने तो नाराज होता. त्याचे अंजूसोबत खटके उडत. त्यातून हे हत्याकांड झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.