22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय वंशाचे लक्ष््मण नरसिम्हन स्टारबक्सचे नवे सीईओ

भारतीय वंशाचे लक्ष््मण नरसिम्हन स्टारबक्सचे नवे सीईओ

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेची प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टारबक्सने सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष््मण नरसिम्हन यांची निवड केली आहे. लक्ष््मण नरसिम्हन आता सीईओ हॉवर्ड शुल्त्स यांच्या जागी कार्यरत होतील. भारतीय लक्ष््मण हे मूळचे पुण्याचे आहेत. जगभरातील दिग्गज कंपन्यांनी सीईओ भारतीय वंशाचे आहेत. आता लक्ष््मण नरसिम्हन यांच्या निवडीमुळे भारताची मान आणखी उंचावली आहे.

लक्ष््मण नरसिम्हन लवकरच सीईओ पदाची जबाबदारी सांभाळतील. ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्ष््मण नरसिम्हन कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टारबक्स कंपनीने सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॉवर्ड शुल्त्स यांना हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास सांगितलं आहे. हॉवर्ड शुल्त्स नरसिम्हन यांच्या मदतीसाठी एप्रिल २०२३ पर्यंत हंगामी सीईओची जबाबदारी पार पाडण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या