लंडन : दक्षिण-पूर्व लंडनमधील रहिवासी गटाने आपल्या सर्वात प्रिय सदस्यांपैकी एक, विमल पंड्या याच्यासाठी लढण्याचा संकल्प केला आहे. पंड्या यांनी कोविड महामारीदरम्यान सेवा दिली होती. ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ-२ वतीने त्यांच्या प्रतिनिधीने त्यांचे कौतुक केले होते. मात्र त्यांच्यावरच आता निर्वासिताचे आयÞुष्य जगण्याची वेळ आली आहे.
विमल पंड्या याला व्हिसावरील कायदेशीर लढाईत पराभव पत्करावा लागला. आता त्याला हद्दपारीचा सामना करावा लागत आहे. पंड्या भारतातून विद्यार्थी व्हिसावर यूकेला गेला होता, परंतु त्याच्या शैक्षणिक संस्थेने परदेशी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्याचा परवाना गमावल्याने त्याचा व्हिसा थांबवण्यात आला होता.