27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताची चिंता स्वाभाविक

भारताची चिंता स्वाभाविक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेजारी देश म्हणून अफगाणिस्तानात जे काही घडत आहे, त्यावर आणि त्याचे या विभागात उमटणा-या परिणामांवर भारताला चिंता वाटणे स्वाभाविक आहे, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले आहे.
जेपी मॉर्गनपुरस्कृत इंडिया इन्व्हेस्टर समिटमध्ये शृंगला बोलत होते. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत भारताने मुख्य मुद्यावर बोट ठेवले.

अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण, नियोजन अथवा पैसा पुरविण्यासाठी होऊ नये अशी भारताची मुख्य मागणी आहे. शेजारी देशांमध्ये विशेषत: अफगाणिस्तानातील घडामोडी आणि पूर्वेकडे चीन यामुळे आम्हाला सुरक्षिततेला निर्माण झालेल्या आव्हानांच्या नव्या वास्तवाची जाणीव झाली आहे. भारताने आपले लक्ष अफगाणिस्तानवर केंद्रित केले होते. तेथील नागरिकांना बाहेर काढण्यावर भर देण्यात आला. विमानतळावरील सुरक्षेच्या कारणांनी हे काम पूर्ण होऊ शकले नाही. काबूल विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याला प्राधान्य असेल. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

विनाअडथळा मदत पोहचविणे गरजेचे
अफगाणिस्तानातील मानवी गरजांवरही लक्ष असल्याचे सांगून शृंगला म्हणाले, अफगाणिस्तानातील मानवी गरजा पूर्ण करणा-यांना विनाअडथळा मदत पोचविता आली पाहिजे. मदत देणा-यांना अफगाणिस्तानात थेट प्रवेश मिळाला पाहिजे. भेदभाव न करता अफगाण लोकांना मदतीचे वाटप व्हायला हवे. अफगाण जनतेशी असलेले नात्यांनुसार आमचा दृष्टिकोन आहे. अफगाण जनतेच्या मदतीसाठी तीन अब्ज डॉलर आम्ही देणार आहोत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या