23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताच्या लस निर्यात बंदीचा गरीब देशांना फटका; चीनकडून बांगलादेश, श्रीलंकेची लूट

भारताच्या लस निर्यात बंदीचा गरीब देशांना फटका; चीनकडून बांगलादेश, श्रीलंकेची लूट

एकमत ऑनलाईन

ढाका : भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर लस निर्यात थांबवण्यात आली होती. भारताने लस निर्यात थांबवण्याचा फटका गरीब, विकसनशील आणि शेजारच्या देशांनाही बसला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश या देशांसमोर लसीकरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारताकडून कोविशील्ड लस न मिळाल्यामुळे या देशांनी चीनकडे धाव घेतली. मात्र, चीनने लशीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.

भारताच्या कोविशील्डच्या एका डोससाठी ५.५ डॉलर मोजावे लागतात. तर, चीनच्या सिनोफार्म लशीच्या एका डोससाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. त्याशिवाय चीनने दक्षिण आशियातील देशांसाठी वेगवेगळे लस दर ठरवले आहेत. बांगलादेशला एक डोससाठी १० डॉलर, तर श्रीलंकेला सिनोफार्मच्या एका लशीच्या डोससाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. बांगलादेशमधील वृत्तपत्र द डेली स्टारने म्हटले की, बांगलादेश सिनोफार्मकडून १.५ कोटी डोस खरेदी करणार आहे. लस डोस खरेदीसाठी कॅबिनेट समितीने त्याला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री एएचएम मुस्तफा कमाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर एका अधिका-याने लसीचा एक डोस १० डॉलरला खरेदी करत असल्याचे म्हटले.

बांगलादेशमध्ये लसीच्या डोसची किंमत समोर आल्यानंतर श्रीलंकेतही यावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या. श्रीलंका सरकारला सिनोफार्मच्या लसींसाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. बांगलादेशमध्येही लस किंमतीच्या मुद्यावरून वातावरण गरम झाले आहे. अर्थ मंत्रालयाने पत्रकारांना लसींची किंमत सार्वजनिक न करण्याची विनंती केली. बांगलादेशचे आरोग्य मंत्री जाहिद मालेक यांनी लसींची किंमत जाहीर करण्यात आली नसल्याचे म्हटले.

सुरक्षा अधिका-यांना अनुभव कथन पुस्तके लिहण्यावर निर्बंध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या