टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन शिक्षक १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्लयानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी च्ािंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या उवाल्डे शहरात हा गोळीबार झाला आहे. येथे १८ वर्षाच्या एका हल्लेखोराने रॉब प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १८ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत. हल्लेखोरालाही ठार करण्यात आलं आहे. तो उवाल्डे हायस्कूलचा विद्यार्थी होता.