21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयन्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर जमलेल्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार

न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर जमलेल्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार

हल्लेखोर ताब्यात ; कॅरोल सिंगिंग पाहण्यासाठी जमलेले लोक

एकमत ऑनलाईन

न्युयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर कॅरोल सिगिंग पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाºया हल्लेखोरावर ताब्यात घेतले आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हल्लेखोराने गोळीबार सुरु केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर गंभीर जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हल्लेखोराचे स्वत: ला मारण्याचे आवाहन
मॅनहट्टम येथे हजारो लोक कॉन्सर्टसाठी जमले होते. कॉन्सर्ट संपल्यानंतर लोक तेथून निघत असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरु केला. चर्र्चच्या पायºयांवर असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरु केल्यानंतर एकच धावपळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने आठ ते दहा गोळया झाडल्या. हल्लेखोर गर्दीवर अंदाधुंदपणे गोळीबार करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी तो मला गोळया घाला, मारुन टाका असेही ओरडत होता असे पोलिसांनी सांगितले आहे.

घरात घुसून महिलेवर अत्याचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या