23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयडेन्मार्कच्या मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार

डेन्मार्कच्या मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार

एकमत ऑनलाईन

कोपनहेगन : डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये गोळीबार झाला. त्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

किती लोक जखमी झाले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, कोपनहेगनचे महापौर हल्ला अत्यंत गंभीर मानत आहेत. घटनास्थळावरून काही फोटोही समोर आले आहेत, यात लोक घाबरून इकडून-तिकडे धावताना दिसत आहेत. मॉलमध्ये गोळीबार सुरू होताच लोक बाहेर पळू लागले.

ज्याला जिथे जागा मिळेल, तिथे जाऊन तो लपत होता. कोणी दुकानाचा आसरा घेतला, तर कुणी मोकळ्या रस्त्यांवर धावताना दिसला. गोळ्यांचा खूप मोठा आवाज येत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेबाबत महापौर सोफी हेस्टोर्प अँडरसन म्हणतात की, किती लोक जखमी झाले आहेत किंवा किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप कळू शकलेल्े नाही. परंतु, हा हल्ला चिंताजनक आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या