लडाख: पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिका-यांमध्ये आज दुस-या फेरीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीआधी चारपैकी तीन ठिकाणाहून भारत आणि चीन दोघांनी आपआपल्या सैन्य तुकडया थोडया मागे घेतल्या आहेत. या चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. शनिवारी लेफ्टनंट जनरल स्तरावर पहिली बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा दोन्ही देशांचे सैन्य थोडे मागे हटले होते. तीन ठिकाणाहून सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला परिस्थिती जैसे थे आहे. हाच भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही बाजूंकडून तिथे कुठलीही हालचाल झालेली नाही.
भारतीय सैन्याची गस्त रोखण्यासाठी उचलले पाऊल
मे महिन्यापासून भारतीय सैन्याची गस्त बंद करण्यासाठी चिनी सैन्याने फिंगर ४ टू फिंगर ८ या भागावर नियंत्रण मिळवले आहे. ६ जून रोजी झालेली चर्चा आणि पुढील काही दिवसांत होणारी चर्चा लक्षात घेत चीनने गालवान व्हॅली, पीपी-१५ आणि हॉट स्प्रिंग्स येथून आपले सैन्य दोन ते अडीच किमी मागे घेतले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे.
१३ जून रोजी बैठक
दोन्ही देशांमध्ये लगेच कुठला शांतता करार होणार नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारतही त्यासाठी तयार आहे. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाºयांमध्ये झालेली प्रदीर्घ चर्चा हे त्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल आहे. चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमधील उंचावरील या युद्ध क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैन्य तुकडया आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. शनिवार १३ जूनच्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखून चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढायचे ठरवले आहे.
Read More दिलासा देणारी बातमी : कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्त लोकांची संख्या वाढली
भारतीय भाग बळकावल्याचे खा़ नामग्याल यांचे पुरावे
चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये प्रवेश केला आहे का असा प्रश्न राहुल यांनी ट्विटवरुन विचारला होता. मात्र आता या प्रश्नाला लडाखचे भाजपा खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी खोचक शब्दामध्ये ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे. होय चीनने लडाखच्या काही भागांचा ताबा मिळवला आहे, असे नामग्याल यांनी ट्विटवरुन म्हटले आहे़ अक्साई चीनपासून पैंगनक, जबजी घाट, दूम चेले अशा प्रदेशांची नावे नामग्याल यांनी शेअर करत हे प्रदेश काँग्रेस सत्तेत असतानाच चीनने आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. आपली अपेक्षा आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस या उत्तराशी सहमत असतील आणि ते पुन्हा या प्रकरणावरुन दिशाभूल करणार नाहीत, असे नामग्याल यांनी आपल्या ट्विटला कॅप्शन देताना म्हटले आहे़
नामग्याल यांनी पोस्ट केलेली यादी खालीलप्रमाणे
> १९६२ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना अक्साई चीन (३७ हजार २४४ किमोमीटर)
> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना २००८ पर्यंत चुमूरमधील तिया पैंगनक आणि चाबजी घाट (लांबी २५० मीटर) प्रदेश गमावला
> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना २००८ साली चीनी सैन्याने देमजोकमध्ये जोरावर किल्ल्याला उद्धवस्त केले आणि २०१२ मध्ये पीएलएने तिथे देखरेख करण्यासाठी केंद्र उभारलं. सिमेंटचे बांधकाम असणारी १३ घरांबरोबरच चीनीने येथे न्यू देमजोक कॉलनीची स्थापना केली
> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना भारताने दुंगटी आणि देमचोकदरम्यानचे दूम चेले (ऐतिहासिक महत्व असलेला व्यापाराचा मार्ग) भारताने गमावला
राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा
नामग्याल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दुसरे ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. चीनी भारतामध्ये शिरले आणि त्यांनी लडाखमधील आपल्या जमीनीवर ताबा मिळवला. या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी एकदम शांत असून ते कुठेच दिसत नाहीत, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे अनेक बडे नेते भारत-चीन सीमावाद प्रश्नावरुन सरकारला सातत्याने प्रश्न विचारताना दिसत आहेत.