21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारत-पाक शांतता चर्चा मावळली

भारत-पाक शांतता चर्चा मावळली

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. मात्र, आता दोन्ही देशांमधील शांतता चर्चा मावळली असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी भारतासोबत पडद्यामागून कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमागील काही कारणे समोर आली आहेत.

दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू व्हावी यासाठी भारत-पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी त्रयस्थ देशांमध्ये भेटले असल्याची चर्चा होती. आता पाकिस्तानने आपला पवित्रा बदलला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटले की, भारताने आॅगस्ट २०१९ मध्ये काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा हटवला. हा निर्णय भारताने मागे न घेतल्यामुळे आता पडद्यामागून कोणत्याही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. मोईद युसूफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, भारतासोबतची चर्चा संपुष्टात आली आहे. भारताने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी (भारत सरकार) काश्मीरसह सर्व मु्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र, भारताने ती पूर्ण केली नसल्याचे त्यांनी म्हटले.

अफगाणवरून चर्चा फिस्कटली?
भारताने कधी व कोठे संपर्क साधला होता, याबाबतची कोणतीही माहिती मोईद युसूफ यांनी दिली नाही. मात्र, पाकिस्तानने भारतासोबत चर्चा न करण्याचे आणखी एक कारण समोर आले आहे. काश्मीर मुद्यासह अफगाणिस्तानमध्ये बिघडत असलेली परिस्थितीदेखील कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

पाकने केले अफगाणिस्तानला लक्ष्य
पाकिस्तानने आपले लक्ष अफगाणिस्तानवर केंद्रित केले आहे. अफगाणिस्तानमध्ये मागील काही महिन्यात तालिबानच्या कारवाया वाढल्या आहेत. कोरोनाचा धोका, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी देशांतर्गत मुद्यावर पाकिस्तान अडचणीत आहे. या समस्यांवर त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानला फार मोठा दिलासा नाही. तर, दुसरीकडे पाकिस्तानने शस्त्रसंधी मान्य केली असल्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका होत आहे.

दोन्ही देशांमध्ये एकमत नाही
भारताने तालिबानच्या नेत्यांशीही दोनदा चर्चा केली आहे. त्यावरूनही पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पडद्यामागून सुरू असलेल्या चर्चेतील पुढील टप्पा काय असावा याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत न झाल्याने आता चर्चा थांबली असल्याचे म्हटले जाते.

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या