29.3 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeआंतरराष्ट्रीयइंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचे निधन

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचे निधन

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : इंटेल कंपनीचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं आज हवाई येथे निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. इंटेल कंपनी आणि गॉर्डन मूर फाउंडेशनने यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी करत माहिती दिली. सेमीकंडक्टरची निर्मिती आणि आजच्या काळात वापरले जाणारे संगणक विकसित करण्यात मूर यांचे मोठं योगदान होते.

गॉर्डन अर्ले मूर यांचा जन्म ३ जानेवारी १९२९ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. मूर यांनी सेमीकंडक्टरची डिझाइन आणि त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मूर यांनी १९६८ साली काही सहका-यांसह इंटेल कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे नाव पूर्वी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स असे होते. मूर हे १९७९ मध्ये इंटेलचे सीईओ बनले. त्यांनी आठ वर्षे सीईओ म्हणून काम केले. मूर यांनी शेवटच्या काही वर्षात स्वत:ला सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वाहून घेतले होते.

गेल्या वर्षी इंटेलने त्यांच्या सन्मानार्थ ओरेगॉन येथील कार्यालयाला गॉर्डन मूर पार्क असे नाव दिले होते.दरम्यान, मूर यांच्या निधनानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शोक व्यक्त केला. याबरोबच अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही मूर यांच्या निधनाने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे एक द्रष्टे व्यक्तीमत्त्व जगाने गमावले आहे, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या