विद्यापीठ मानांकनात भारत पिछाडीवर- ऑक्सफर्ड सलग पाचव्या वर्षी प्रथम – तीनशे ते पाचशेमध्ये भारताच्या केवळ तीन संस्था
नवी दिल्ली : जागतिक उत्कृष्ट विद्यापीठांची यादी दि. २ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पहिल्या ३०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेला आपले स्थान मिळविता आले नाही. विशेषत: या मानांकनासाठी भारतातून सर्वाधिक ६३ शिक्षणसंस्थांनी सहभाग घेतला होता. दुसरीकडे भारताचा शेजारी व कट्टर प्रतिस्पर्धी चीनच्या सिन्हूआ विद्यापीठाने सर्वाेत्कृष्ट पहिल्या २० मध्ये स्थान निश्चित करीत २० व्या स्थानी मान पटकावला आहे.
दरवर्षी जगातील सर्वाेत्कृष्ट विद्यापीठ, शिक्षणसंस्थांचे विविध निकषांनुसार मानांकन जाहीर केले जाते. भारतातील आयआयटी, आयआयएससारख्या ६३ संस्थांनी मानांकनासाठी पात्रता मिळवली. मात्र निकषांवर न उतरल्याने पहिल्या ३०० क्रमांकांमध्ये एकाही संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही. पहिल्या दोनशे शिक्षणसंस्थांच्या यादीत अमेरिकेच्या सर्वाधिक ५९ संस्थांचा समावेश आहे. अमेरिकेनंतर इंग्लंड २९ व जर्मनीच्या २१ संस्थांचा समावेश आहे. टाईम्सने सुमारे ९३ देशांमधील १५२७ संस्थांची पडताळणी केली. शिक्षण, संशोधन, ज्ञानविस्तार व जागतिक दृष्टिकोन आदी निकषांवर ही पडताळणी करण्यात आली. अमेरिकेच्याही ५० टक्के संस्थांना गतवर्षीप्रमाणे पहिल्या वीसांमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले आहे.
ऑक्सफर्ड पहिल्यास्थानी कायम
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग पाचव्या वर्षी पहिला क्रमांक टिकवला आहे. मात्र चीनकडून इंग्लंड शैक्षणिक क्षेत्रातील दादागिरीला धक्का दिला जात आहे. इंग्लंडच्या गतवर्षी पहिल्या २० मध्ये स्थान पटकावणा-या ५ संस्थांना यंदा आपले स्थान टिकवण्यात अपयश आले.
‘आयआयएस’चा ३०१ नंतर समावेश
पहिल्या ३०१ ते ५०० क्रमांकांमध्ये भारतातील आयआयएस (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), आयआयटी रोपार, आयआयटी सोपोर या तीनच संस्थांचा समावेश आहे. मात्र मानांकनाच्या स्पर्धेत पात्र होणा-या संस्थांच्या यादीत भारताच्या १४ संस्थांची वाढ ही दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे.
अमेरिकेच्या पहिल्या २० मध्ये ५० टक्के संस्था
अमेरिकेच्याही ५० टक्के संस्थांना गतवर्षीप्रमाणे पहिल्या वीसांमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षात पहिल्या १०० संस्थांमध्ये चीनच्या संस्थांच्या संख्येत ३ वरुन ६ अशी दुप्पट वाढ झाली आहे.
भारताला शैक्षणिक सुधारणांची गरज
गेल्या पाच वर्षात पहिल्या १०० संस्थांमध्ये चीनच्या संस्थांच्या संख्येत ३ वरून ६ अशी दुप्पट वाढ झाली आहे. जागतिक उत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीतही चीनने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून या उलट भारताला शैक्षणिक क्षेत्रात अजून भरपूर सुधारणा करण्याची गरज दिसून येत आहे.
आईच्या सांगण्यावरून खून : …..दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता