24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइंटरनेट एक्सप्लोरर कायमचे शट डाऊन

इंटरनेट एक्सप्लोरर कायमचे शट डाऊन

एकमत ऑनलाईन

सॅनफ्रान्सिस्को : जगाला इंटरनेटच्या दुनियेची ओळख करून देणारे ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ हे ब्राऊजर आज अधिकृतरित्या बंद झाले. मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ या ब्राऊजरचा सपोर्ट बंद केला आहे. यामुळे ‘ब्लॅक बेरी’, डायल-अप मोडेम, पाम पायलट्स अशा इतिहासजमा झालेल्या अ‍ॅप्लिकेशनच्या यादीत ‘इंटरनेट एक्सप्लोरर’चाही समावेश झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने ऑगस्ट १९९५ मध्ये ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ लाँच केले होते. तेव्हापासून २०१३ पर्यंत या कंपनीने ‘इंटरनेट एक्सप्लोरर’चे ११ व्हर्जन बाजारात आणले. मात्र, २०१५ मध्ये या कंपनीने ‘एज’ हे नवे ब्राऊजर बाजारात लाँच करून ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ला अलविदा करण्याची तयारी सुरु केली होती. १५ जून २०२२ ला ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद करणार असल्याचे या कंपनीने गेल्याच वर्षी जाहीर केले होते. त्यामुळे आजची त्यांची घोषणा अपेक्षितच होती.

मायक्रोसॉफ्टच्या ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ने सुरुवातीच्या काळात इंटरनेट विश्­वावर वर्चस्व निर्माण केले होते. ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ म्हणजेच इंटरनेट अशीच त्याची ओळख बनली होती. नंतर मात्र इतर विविध आणि अद्ययावत ब्राऊजर निर्माण झाले आणि त्या स्पर्धेत ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ मागे पडत गेले. ‘विंडोज’च्या मदतीने वर्चस्व निर्माण करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांना कायदेशीर मार्गाने रोखले गेले आणि त्यांची मक्तेदारी संपली. यानंतर मोझिला फायरफॉक्स, ओपेरा, गुगल क्रोम या ब्राऊजरचे युग सुरु झाले. या युगात टिकून राहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने सात वर्षांपूर्वी ‘एज’ ब्राऊजर लाँच केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या