लंडन : ब्रिटनचे राजघराणे सोडून अमेरिकेत स्थायिक झालेले प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल यांना तीव्र मतभेद असूनही किंग चार्ल्स यांनी आपल्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित केले आहे. खुद्द प्रिन्स हॅरी यांनी ही माहिती दिली आहे.
त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांना राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी आमंत्रित करणारा एक मेल प्राप्त झाला आहे. मात्र, राजेशाही सोडलेल्या या जोडप्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, हे स्पष्ट केलेले नाही. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल या दोघांनी बंिकघम पॅलेसवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता.