18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालिबान्यांवर आयसीसचा हल्ला

तालिबान्यांवर आयसीसचा हल्ला

एकमत ऑनलाईन

काबुल : अफगानिस्­तानच्या जलालाबादमध्ये शनिवारी आणि रविवार झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस खोरसानने घेतली आहे. या हल्ल्यामध्ये तालिबानला निशाणा बनवण्यात आले होते. आयएसआयएस-के ने जलालाबादमध्ये तालिबानच्या ३ वाहनांवर हल्ला केला होता. इथे एका पाठोपाठ एक ३ स्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २० लोक जखमी झाले. जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी आता आयएसआयएस-खोरासानने घेतली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलेही जखमी झाल्याचे तालिबानी अधिका-याने सांगितले आहे.

तिकडे नंगरहा प्रांतातील आरोग्य विभागाच्या एका अधिका-याच्या म्हणण्यानुसार, जलालाबाद ही इस्लामिक स्टेट खोरासानची राजधानी आहे. याच संघटनेने काबुल विमानतळाबाहेर बॉम्बब्लास्ट केला होता, ज्यात अमेरिकी नागरिकांसह अफगाणी नागरिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात तब्बल १०० लोकांनी आपला जीव गमावला आहे. जलालाबाद ही नंगरहार प्रांताची राजधानी आहे, जो भाग आयएसआयएस-खुरासानचा गढ समजला जातो. आणि त्यातच आयएसआयएआय हा तालिबानला आपला शत्रू मानतो.

३५ तालिबान्यांना मारल्याचा दावा
दरम्यान या स्फोटांची तालिबानकडून सध्या चौकशी सुरु आहे. याबद्दल बोलताना सांगितले आहे की, या हल्ल्यात कमीत कमी ३५ तालिबानी मारले गेला आहे किंवा जखमी झाले आहेत. या दाव्यावर अद्याप तालिबानकडून कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या