27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआयएसआयएसच्या दहशतवाद्याला रशियात अटक

आयएसआयएसच्या दहशतवाद्याला रशियात अटक

एकमत ऑनलाईन

मास्को : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्लेखोराला रशियात अटक करण्यात आली आहे. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या एका मोठ्या नेत्याला आत्मघातकी हल्ल्यात ठार मारण्याची योजना त्याने आखल्याची कबुली त्याने दिली आहे. रशियन सरकारी एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सुरक्षा सेवेने दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने त्याची ओळख मध्य आशियाई देशातील रहिवासी म्हणून केली आहे. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या नेमक्या कोणत्या नेत्यावर हल्ला करण्याची त्याची योजना होती याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने एप्रिल ते जून या कालावधीत तुर्कीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. आयएस त्याला आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती करून घेत त्याला आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण दिले होते.

रशियन सरकारी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी संघटनेने संबधित दहशतवाद्याला आवश्यक कागदपत्रांसह रशियाला पाठवले आणि नंतर येथून त्याला भारतात पाठविण्याची व्यवस्था केली होती. भारतात दाखल झाल्यानंतर येथे सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर हल्ल्या करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, दहशतवाद्याने कोणत्या भारतीय नेत्याला उडवण्याचा कट रचला होता, याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

गुप्तचर यंत्रणांकडून अ‍ॅलर्ट
एक दिवस आधी गुप्तचर यंत्रणांनी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा अ‍ॅलर्ट जारी केला होता, ज्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसने पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट रचल्याचे सांगण्यात आले होते. अ‍ॅलर्टनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याचे नमुद केले होते. दहशतवादी चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ले करू शकतात आणि बसस्थानकांना लक्ष्य करू शकतात असा अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता.

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा, १९६७ अंतर्गत भारताने आयएसआयएस आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आयएसआयएसने इंटरनेटवरील कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांची विचारधारा पसरवली. सायबर स्पेसवरील एजन्सी याबाबत दक्ष आहेत आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या