22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतर इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन

तर इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : इस्रायलचे लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये सुरु असणाºया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बायडन यांनी या संघर्षासंदर्भात भाष्य करताना इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.

बुधवारी रात्री बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. गाझा पट्ट्यामध्ये इस्रायल आणि हमासचा २०१४ नंतरचा सर्वात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना, हा संघर्ष लवकरच संपेल अशी मला आशा आहे, असे स्पष्ट केले तसेच, जेव्हा इस्रायलच्या सीमा ओलांडून हजारो रॉकेट त्यांच्यावर हल्ला करण्यात येत असेल तर त्यांना स्वत:चे संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे, असेही बायडन म्हणालेत.

इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असणारा हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने इजिप्त आणि कतारमध्ये आपले राजकीय दूत पाठवले आहेत. चर्चेमधून हा संघर्ष शांत करण्याला अमेरिकेचं प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून इस्रायलवर हमासने रॉकेटच्या माध्यमातून हल्ले केले. इस्रायलनेही याचे जशास तसे उत्तर देत हमासवर एअर स्ट्राइक केला. दोन्हीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारपासून हा संघर्ष सुरु असून मरण पावलेल्या ६० जणांमध्ये सर्वाधिक पॅलेस्टिनी लोकांचा समावेश आहे. यामध्ये इस्रायलच्या सहा जणांचाही मृत्यू झालाय. बुधवारी सायंकाळी हमासकडून तेल अवीववर रॉकेट हल्ले करण्यात आले. इस्रायलमधील तेल अवीव हे आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाचे शहर आहे.

लवकरच २ ते १८ वयोगटांचे लसीकरण; भारत बायोटेकला चाचणीसाठी मंजुरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या