26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलने गाझा सीमेवर पाठवले सैन्य

इस्रायलने गाझा सीमेवर पाठवले सैन्य

एकमत ऑनलाईन

जेरुसलेम : इस्रायलच्या सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात जेरूसलेममधील अल-अकसा मशिदीतील नमाज अदा करणाºयांवर हल्ला केला होता. त्यानंतर हिंसाचार उफाळून आला होता. दरम्यान गाझाच्या सीमेवरच्या भूमीवर लढा देण्यासाठी इस्राईलने आपले सैन्य पाठवले आहे. एएफपीच्या अहवालानुसार, इस्रायली हल्ल्याच्या धमकीमुळे बरेच लोक गाझामध्ये घरे सोडून जात आहेत.

आतापर्यंत दोन्ही गटांमधील लढाई फक्त हवाई हल्ले आणि रॉकेट गोळीबारापर्यंत मर्यादित होती, परंतु आता इस्रायलने जमिनीवर लढायला सैन्य पाठवले असून त्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. इस्त्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, इस्त्रायली विमान आणि जमिनीवरून सैन्य गाझा पट्टीवर हल्ला करीत आहेत. इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते जॉन कॉनरिकस यांनीही याची पुष्टी केली आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात सैन्य आणि हवाई दल यांचा सहभाग होता, परंतु सैन्याने गाझामध्ये प्रवेश केला नव्हता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी सकाळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टाईन अतिरेक्यांविरूद्ध इस्त्राईलची लष्करी कारवाई आवश्यकता असेपर्यंत सुरू राहील. नेतान्याहू म्हणाले की, गाझाची इस्लामिक संस्था हमास त्याची मोठी किंमत मोजेल. तसेच हमास सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, जर इस्त्रायली सैन्याने जमिनीवर लढाई सुरू केली तर त्यांची संघटना त्यांना कठोर धडा शिकवण्यास तयार आहे.

नीरव मोदी हाजीर हो; मुंबईतील विशेष न्यायालयाने बजावले समन्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या