28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्त्रायलचा विरोधकांना इशारा

इस्त्रायलचा विरोधकांना इशारा

एकमत ऑनलाईन

जेरुसलेम : इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात तणाव वाढत असताना, हमास रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलच्या सैन्याने गाझा शहराच्या अनेक ठिकाणी जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूच्या २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज इस्त्रायलने विरोधकांना इशारा सुध्दा दिला आहे़

या इमोजीसच्या ट्विटनंतर या अकाऊंटवरुन आणखी एक ट्विट करण्यात आले आहे. तुम्हा सगळ्यांना फक्त काही दृष्टीकोन देण्यासाठी, इस्त्रायली नागरिकांवर डागण्यात आलेल्या रॉकेटची ही एकूण किंमत आहे. यापैकी प्रत्येक रॉकेट मारण्यासाठीच आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. चुक करू नका. प्रत्येक रॉकेटचा एक पत्ता असतो. जर तो पत्ता तुमचाच असेल तर तुम्ही काय कराल? असा इशाराही इस्त्रायलने त्यानंतरच्या ट्विटमध्ये दिला आहे.

सध्या सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये अनेक सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असले तरी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी हल्ले सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर हे हवाई हल्ले सुरूच आहेत. इस्त्राईलने या संदर्भात १६२८ रॉकेटचे इमोजी असलेल्या ट्विटची मालिकाच टाकली आहे. इस्त्रायली नागरिकांवर डागण्यात आलेल्या रॉकेटची ही एकूण किंमत आहे. यापैकी प्रत्येक रॉकेट मारण्यासाठीच आहे, असे आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर नेटीझन्सकडून तीव्र टीका करण्यात आली आहे.

भारत-नेपाळ सीमेवर हाणामारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या