28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला

इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला

एकमत ऑनलाईन

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. इस्रायलचे सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष सातव्या दिवशीही सुरू आहे. अशातच आता इस्रायली सैन्याने गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला असून, यामध्ये हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.

इस्रायलच्या लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ले सुरूच आहे. तर, हमासदेखील सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. हमासने सुमारे २ हजार रॉकेट डागले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने हमासविरोधातील कारवाई तीव्र केली असून आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. सेना प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल हिदाई जिल्बरमॅन यांनी यासंदर्भातील माहिती इस्रायली रेडिओला दिली. हमासमधील सर्वांत ज्येष्ठ नेते येहियेह सिनवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचे समजते.

नेतान्याहू यांनी मानले समर्थक देशांचे आभार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या