24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइटली २८ जूनपासून मास्क फ्रि

इटली २८ जूनपासून मास्क फ्रि

एकमत ऑनलाईन

रोम : गेल्या वर्षी इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातल्या नंतर अनेक पिढ्यांनी पाहिली नाही अशी भयंकर स्थिती तिथे निर्माण झाली होती. अवघी सहा कोटी लोकसंख्या असणा-या देशामध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या होती. त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे.

इटलीमध्ये, २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे. गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने कोरोनावर मात करत मास्कपासून मुक्तता मिळवली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी फेसबुकवर व्हायरस किती वेगाने पसरत आहे याबद्दल लिहिले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा प्रशासनातर्फे उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या