25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनामुक्तचे स्वप्न पाहण्यास हरकत नाही

कोरोनामुक्तचे स्वप्न पाहण्यास हरकत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नसल्याचे वक्तव्य केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसींवर सध्या अनेक देशांमध्ये काम सुरु आहे.

काही देशातील कोरोना प्रतिबंधक लसी तिसºया टप्प्यातही असून, त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण कोरोना महामारी लवकरच संपेल, असे स्वप्न पाहण्यास हरकत नसल्याचे मत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सभेत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस हे असे म्हणाले की, जगाने माणसाची चांगली रुपे कोरोना काळात पाहिली आहेत, तशीच वाईटही रुपे पाहिली आहेत. पण ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकते हे विसरुन चालणार नाही.

अपघातातील जखमीस पोलिस उपनिरीक्षकांनी दिले रक्त

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या