23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयजो बायडेन करणार ५० कोटी लसींचे दान

जो बायडेन करणार ५० कोटी लसींचे दान

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात कोरोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अमेरिका प्रशासन कोरोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लसींचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला. तसेच अध्यक्ष जो बायडेन जी-७ बैठकीत घोषणा करतील असे सांगितले.

जगातील ब-याच देशात लसीची कमतरता आहे. जो बायडेन निर्णयामुळे त्या देशांना मदत होईल. अमेरिकेत लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यानंतर तेथील कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.

अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटनमधील ७ देशांसोबत जी-७ च्या बैठकीपूर्वी लस दान करण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा स्थानिक माध्यमांनी बायडेन यांना जगाला लस देण्याच्या धोरणा विषयी विचारले तेव्हा त्यांनी, लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले. बायडेन ही घोषणा करण्यासाठी फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांच्यासमवेत हजर राहण्याची शक्यता आहे. ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगाच्या हितासाठी असेल, असेही सांगण्यात आले आहे.

दोन वर्षांच्या चिमुकल्यावर लसीची चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या