34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच

पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : सौदी अरेबियन पत्रकार आणि वॉशिंग्टन पोस्ट चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जमाल खागोशी यांच्या हत्येच्या कटाला सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच परवानगी दिली होती, असे अमेरिकने गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात म्हटले आहे. २ ऑक्टोबर रोजी खाशोगी यांची सौदीच्या दूतावासात क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

पत्रकार जमाल खाशोगी यांची सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली. खाशोगी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. खाशोगी यांच्या हत्येने जगभर खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी महत्त्वाचा दावा केला आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये ऑपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने अहवालात म्हटले आहे.

खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात आता अमेरिका सौदी नागरिकांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसा इशारा बायडेन प्रशासनाने दिल्याचे वृत्त आहे. व्हिसावर निर्बंध घालण्याची घोषणा अमेरिकडून केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यातून सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना वगळण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या