लंडन : विकिलिक्स या मीडिया कंपनीचे संस्थापक ज्युलिअन असांजे यांच्या प्रत्यार्पणाची अमेरिकेची मागणी ब्रिटनन’ मान्य केलीे. त्यामुळे असांजेला मोठा धक्का बसला आहे. याविरोधात असांजे कोर्टात धाव घेणार असल्याचे विकिलिक्सने सांगितले आहे. अमेरिकन लष्कराची अनेक गुपित असांजे यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून उघड केल्याप्रकरणी त्यांना १७५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी असांजेच्या प्रत्यार्पण अर्जावर सही केली आहे. यापूर्वी ब्रिटनेच्या कोर्टाने एप्रिल महिन्यात असांजेच्या प्रत्यार्पणाची व्यवस्था केली होती. अमेरिकेकडीलं प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी असांजेच्या प्रयत्नांविरोधात हे महत्वाचे पाऊल आहे. परंतु असांजेजवळ अजूनही संधी आहे. असांजेला अपिलासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
सीआयएकडून हत्येचा कट : दरम्यान, असांजेच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर विकिलिक्सने अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने असांजेच्या हत्येचा कट रचला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. तसेच माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ब्रिटिश लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याचेही विकिलिक्सने म्हटले आहे.