25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeआंतरराष्ट्रीयके.पी. शर्मा ओली यांचे पंतप्रधानपद गेले

के.पी. शर्मा ओली यांचे पंतप्रधानपद गेले

एकमत ऑनलाईन

काठमांडू : नेपाळमधील के.पी. शर्मा ओली सरकारला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. २३२ पैकी १२४ मतं त्यांच्या विरोधात पडली. पंतप्रधान ओली २७५ सदस्य असलेल्या सदनात बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत.

ओली यांना फक्त ९३ मते पडली. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासमत विरोधात १२४ मते पडली. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे कलम १०० (३) अंतर्गत त्यांचें पंतप्रधानपद गेले आहे.

पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टीने ओली सरकारला दिलेले समर्थन काढल्याने सरकार अल्पमतात आलं होतं. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने आपल्या खासदारांना व्हिप जारी करत पंतप्रधानांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. मात्र पक्षातील नाराज खासदारांची समजूत काढण्यास ते अपयशी ठरले.

लसीकरण कार्यक्रमात न्यायालयीन हस्तक्षेप नको

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या