24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयके.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

के.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

एकमत ऑनलाईन

काठमांडू : कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरूच आहेत. नेपाळमध्ये गुरूवारी विरोधी पक्षाला नवे सरकार स्थापन करण्यास आवश्यक असलेले बहुमत सिद्ध करण्यास अपयश आले. यानंतर नेपाळच्या संसदेने मोठा राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रुपात के.पी. शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा सोपवली. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केले.

तीन दिवसांपूर्वी ओली यांना संसदेच्या प्रतिनिधी सभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले होते़ त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु यानंतर विरोधकांनाही बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानातील कलमानुसार प्रतिनिधी सभेत सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रूपात ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी ओली यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

जनतेचे दु:ख मला समजतेय; पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या